Join us

माटुंगा येथील लग्नाच्या हॉलमध्ये सिलेंडर गळती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 13:02 IST

पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. 

मुंबई -  माटुंगा पूर्वेकडील लक्ष्मीनारायण लेनवरील गुर्जरवाडी हा लग्नाचा हॉल आहे. आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लग्नाच्या हॉलमधील जेवण बनविण्याच्या ठिकाणी कॅटरिंगवाल्यांचे जेवण बनविण्याचे काम सुरु होते. त्यादरम्यान किरकोळ आगीने पेट घेतला होता. मात्र, प्रसंगावधान दाखवत सिलेंडर बंद करून ठेवण्यात आला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्या रवाना झाली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. तसेच पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सिलेंडर हॉलच्या बाहेर काढून ठेवला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर गळती झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दलपोलिसलग्न