Join us

गोरेगावात एमेरल्ड क्लबला आग; ६ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 18:02 IST

जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देगोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम्स इस्टेट येथील आरे रोडवर असलेल्या या क्लबला आग लागली आहे.जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील एमेरल्ड क्लबला आग लागली असून या आगीत ६ जण जखमी झाले आहेत. गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम्स इस्टेट येथील आरे रोडवर असलेल्या या क्लबला आग लागली आहे. ही आग आज दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक झाले असून जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

या आगीत जितेंद्र तिवारी (३३) (२० टक्के भाजलेले), अंकित मोंडलकर (२९) (८० टक्के भाजलेले), दिनेश सिंग (४३) (२० टक्के भाजलेले), संदीप शेट्टी (३०), (१२ टक्के भाजलेले), मनोज पंत (२१) ९१० टक्के भाजलेले) आणि राहुल सिंग (३९) (२० टक्के भाजलेले) असून यापैकी अंकित मोंडलकर हे ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताग्रस्त असण्याची शक्यता आहे. या सर्व जखमींवर ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

 

टॅग्स :आगपोलिसपुणे अग्निशामक दलहॉस्पिटल