जागेवरून दोघांमध्ये वाद, वांद्रे स्थानकात उतरून एकाने भिरकावला दगड, तिसऱ्याला गंभीर दुखापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:35 IST2026-02-07T12:34:46+5:302026-02-07T12:35:42+5:30

Mumbai Bandra Railway Station News: मुंबई लोकलमध्ये जागेवरून होणारे वाद किती विकोपाला जाऊ शकतात, याचा धक्कादायक प्रत्यय वांद्रे स्थानकात आला आहे.

Fight Over Train Seat, Stone Pelts Third Passenger, Accused Arrested Within 36 Hours at Bandra | जागेवरून दोघांमध्ये वाद, वांद्रे स्थानकात उतरून एकाने भिरकावला दगड, तिसऱ्याला गंभीर दुखापत!

जागेवरून दोघांमध्ये वाद, वांद्रे स्थानकात उतरून एकाने भिरकावला दगड, तिसऱ्याला गंभीर दुखापत!

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ प्रवाशावर दगडफेक झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. वांद्रे रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित आरोपीला अवघ्या ३६ तासांत अटक केली.  दादर (पूर्व) येथे राहणारे निशांत रामकुमार खत्री (२८) हे अंधेरी स्थानकावरून रात्री १०:४० वाजता चर्चगेट फास्ट लोकलने घरी जात होते. 

जागेवर बसण्यावरून दोघांमध्ये वाद

- लोकलमध्ये बसण्याच्या कारणावरून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. ११ वाजता ही लोकल वांद्रे स्थानकात पोहोचल्यावर त्यातील एकाने उतरून रुळाजवळील दगड धावत्या लोकलकडे फेकला. तो दगड खत्री यांच्या डाव्या डोळ्याला लागल्याने ते जखमी झाले. 

- प्रवाशाला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खत्री यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा माग काढला. तपासादरम्यान योगेंद्र बंजारा असल्याचे निष्पन्न झाले. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून सध्या वसई–नवघर येथे राहतो.

Web Title : सीट पर विवाद के बाद पत्थर से हमला, यात्री घायल।

Web Summary : लोकल ट्रेन में सीट को लेकर हुए विवाद में बांद्रा स्टेशन पर एक यात्री पर पत्थर फेंका गया। निशांत खत्री घायल हो गए, और पुलिस ने 36 घंटे के भीतर आरोपी योगेंद्र बंजारा को गिरफ्तार कर लिया। घटना 3 फरवरी को हुई।

Web Title : Argument over seat leads to stone attack, injures passenger.

Web Summary : A dispute over seating on a local train led to a passenger being struck by a stone thrown at Bandra station. Nishant Khatri was injured, and police arrested the accused, Yogendra Banjara, within 36 hours. The incident occurred on February 3rd.