निवडणुका बॅलेटपेपरवर होणार असल्याने सरकारला पराभवाची भीती - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:24 AM2019-08-08T01:24:35+5:302019-08-08T01:24:42+5:30

२७ वर्षांनी होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने संघटनांमध्ये नाराजी

Fear of losing government as elections will be held on ballot papers - Nationalist Youth Congress | निवडणुका बॅलेटपेपरवर होणार असल्याने सरकारला पराभवाची भीती - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

निवडणुका बॅलेटपेपरवर होणार असल्याने सरकारला पराभवाची भीती - राष्ट्रवादी युवक काँग्रेस

googlenewsNext

मुंबई : बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस विभागावर फार मोठा ताण येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी यासंदर्भात विचार करुन सदर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र यावर विविध पक्षाच्या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणूक या बॅलेट पेपरवर होणार असल्याने यामध्ये जर आपला पराभव झाला तर आगामी विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होऊन पराभवाला सामोरे जाण्याची भीती मनामध्ये असल्याने सरकारकडून राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून होणाºया निवडणुका पुढे ढकलल्या असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी व्यक्त केली.

तब्बल २८ वषार्नंतर घोषित झालेल्या निवडणुकांचे महत्व लक्षात घेता, या निवडणुका वेळेवर होणे गरजेचे आहे, परंतु सरकार महाविद्यालयीन निवडणुका घेण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने महाविद्यालयीन निवडणुका पुढे घेण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय दुदैर्वी आहे, असे मत कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केले.
अशी चालढकल करून सरकार महाविद्यालयीन निवडणुका होऊ नये म्हणून प्रयत्न तर करीत नाहीये ना ? असा संतप्त सवाल देखील ओव्हाळ यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे विद्यार्थी रोषास सामोरे जावे लागेल व घोषित झालेल्या महाविद्यालयीन निवडणुका याच शैक्षणिक सत्रामध्ये घेण्यासाठी सरकारचा आग्रह राहील असेही ओव्हाळ यांनी सांगितले.

राज्यसरकारने विद्यार्थी निवडणुकी संदर्भात घेतलेला निर्णय राजकीय असल्याची प्रतिक्रिया छात्रभारतीचे सचिन बनसोड यांनी व्यक्त केली. युवासेना-अभाविप विरोधात सर्व समविचारी संघटनांना छात्रभारती विद्यार्थी संघटनेने एकत्र आणल्यामुळे यांना या निवडणुकीत घातपात किंवा पराभव होईल असा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे विद्यार्थी संघटनांना भीती वाटत आहे आणि या गोष्टीचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत होईल याची सुद्धा भिती वाटत असल्याने ही निवडणूक पुढे ढकलली असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Fear of losing government as elections will be held on ballot papers - Nationalist Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.