बस अन् पिकअपचा भीषण अपघात; टेम्पोचालक ठार, बस ड्रायव्हर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 08:06 IST2023-03-03T08:05:43+5:302023-03-03T08:06:57+5:30

वाकोला परिसरातील मार्गावर बस आणि पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक बसली.

Fatal accident involving bus and pickup; Tempo driver killed, bus driver absconding in mumbai | बस अन् पिकअपचा भीषण अपघात; टेम्पोचालक ठार, बस ड्रायव्हर फरार

बस अन् पिकअपचा भीषण अपघात; टेम्पोचालक ठार, बस ड्रायव्हर फरार

मुंबई - शहरातील वाकोला परिसरात रात्रीच्या सुमारास लक्झरी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झालं आहे. याबाबत माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत लक्झरी बसच्या ड्रायव्हरने पळ काढला होता. रात्री उशिरा हा अपघात झाला.

वाकोला परिसरातील मार्गावर बस आणि पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक बसली. त्यानंतर, बाजुलाच असलेल्या डिव्हायडरवर जाऊन टेम्पो आदळला होता. या दुर्घटनेत टेम्पोचालकाला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीवरच मृत्यू झाला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून रस्त्यावरील टम्पो क्रेनच्या सहाय्याने रात्री उशिरा हटविण्यात आला. 

दरम्यान, घटनेनंतर लक्झरी बसचा चालक पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 
 

Web Title: Fatal accident involving bus and pickup; Tempo driver killed, bus driver absconding in mumbai