व्हॉट्सअॅपद्वारे बनावट पासचा वापर; दोन महिलांवर फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:11 IST2026-01-12T13:11:16+5:302026-01-12T13:11:16+5:30
फर्स्टक्लासच्या डब्यात चढून उडवाउडवीची उत्तरे

व्हॉट्सअॅपद्वारे बनावट पासचा वापर; दोन महिलांवर फसवणुकीचा गुन्हा
मुंबई: एआयचा वापर करून एसी लोकलचा पास तयार केल्याच्या घटनेनंतर आता व्हॉट्सअॅपद्वारे बनावट पासचा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन महिलांवर वांद्रे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य तिकीट निरीक्षक दीपिका मूर्ती ९ जानेवारीला चर्च गेट ते विरारदरम्यान तिकीट तपासणी करीत होत्या. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक ७ वरून सुटलेल्या अप चर्च गेट जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करताना एका महिलेने त्यांना मोबाइलमधील पास दाखविला. संशय आल्याने मूर्ती यांनी संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी वांद्रे स्थानकात उतरवले. सुरुवातीला महिलेने पास खरा असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पासचा आयडी क्रमांक व पास क्रमांक तपासला. डीसीटीआय कंट्रोलमार्फत संबंधित मोबाइलवरील यूटीएस तिकिटाची पडताळणी केली असता, पास बनावट असल्याचे स्पष्ट झाले.