फेसबुक हॅक करून टाकले अश्लील व्हिडीओ; अनोळखी हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:35 IST2023-09-04T12:34:51+5:302023-09-04T12:35:34+5:30

हॅकरच्या विरोधात एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Facebook hacked and posted obscene videos; A case has been registered against the unknown hacker | फेसबुक हॅक करून टाकले अश्लील व्हिडीओ; अनोळखी हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल

फेसबुक हॅक करून टाकले अश्लील व्हिडीओ; अनोळखी हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी बॉलिवूडच्या गाण्यावर सेक्सोफोन वाजवत उदरनिर्वाह चालवणाऱ्या आर्टिस्ट भावा-बहिणीचे फेसबुक खाते हॅक करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यावर अश्लील व्हिडीओ स्टोरी पोस्ट करत त्यांची बदनामी करत फॅन फॉलोअर्सही घटवले. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर अनोळखी हॅकरच्या विरोधात एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार भरतकुमार भावसार (वय ५२) यांची मुलगी आणि मुलगा हर्ष (१९) हे सेक्सोफोनिस्ट आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन भावसार करतात तसेच या दोघांनीही त्यांचे फेसबुक पेज तयार केले आहे. ज्यावर त्यांच्या फॅन फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत होती. मुलांच्या पेजवरून एडल्ट कन्टेन्ट अपलोड झाला.

तेव्हा ते कायमस्वरूपी बंद करायचे नसेल तर पाठवलेल्या ठरावीक लिंकवर माहिती भरावी, असेही त्यात नमूद करण्यात आले. ते वाचल्यावर मुलांचे फेसबुक खाते नष्ट होत आणि त्यांची सगळी मेहनत वाया जाईल या भीतीने भावसार यांनी त्या लिंक ओपन केल्या. त्यानंतर मुलांच्या फेसबुकचा ॲक्सेस त्यांच्याकडून निघून गेला. दुसऱ्या दिवशीदेखील फेसबुक खाते उघडण्यात त्यांना अडचणी येऊ लागल्या. पेजवर अश्लील व्हिडीओ अपलोड करण्यात आला.

Web Title: Facebook hacked and posted obscene videos; A case has been registered against the unknown hacker