मोठी बातमी! राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 20:25 IST2024-01-30T20:13:27+5:302024-01-30T20:25:03+5:30
राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे.

मोठी बातमी! राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय
Maratha Reservation ( Marathi News ) : मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची मुदत ३१ जानेवारी होती, पण आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मागासर्व आयोगाने सर्वेक्षणाची मुदत आणखी दोन दिवस वाढवून दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटलांची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम
आज दुपारी तीन वाजता या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली. गेल्या काही दिवसापासून हे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षण करताना अनेक अडचणी येत असल्याची काही अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल लवकरात लवकर कसा करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली.
राज्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पण या सॉफ्टवेअरमध्ये अनेक ठिकाणी अडचणी आल्याचे दिसत आहे. यावरही आज चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी मराठवाडा दौरा केला. यावेळी त्यांनी सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणाचे काम शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. पण आता याची आणखी २ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.