पोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 07:29 PM2019-10-10T19:29:33+5:302019-10-10T19:32:34+5:30

गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Extension of 77 thousand temporary posts in the police department | पोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ

पोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ

Next
ठळक मुद्देपुढील दोन वर्षासाठी सध्यस्थितीच्या ठिकाणी पुढील दोन वर्षे कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. राज्यभरात एकूण ७६ हजार ८१२ पदे आहेत. त्यांची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत होती.

मुंबई - राज्य पोलीस दलातील विविध घटकामध्ये कार्यरत असलेली एकूण ७६ हजार ८१२ अस्थायी पदांना मुदतवाढ मिळाली आहे. पुढील दोन वर्षासाठी सध्यस्थितीच्या ठिकाणी पुढील दोन वर्षे कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. आवश्यकतेमुळे या पदांना मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलीस महासंचालक कार्यालयातर्गंत कार्यरत असलेल्या विविध पोलीस घटकामध्ये शाखा व विभाग आवश्यकतेनुसार स्थापन करण्यात आलेली आहेत. त्याठिकाणी पोलीस व कार्यालयीन पदांची तात्पुरत्या स्वरुपात निर्माण केली आहेत. गुन्ह्याचा तपास, प्रशिक्षण तसेच कायदा व सुव्यवस्था आदी कारणांसाठी ही पदे बनविलेली आहेत. नवीन पदाच्या निर्मितीला मंजुरी मिळत नसल्याने अस्थायी स्वरुपात कार्यरत ठेवली जातात. अशा प्रकारे राज्यभरात एकूण ७६ हजार ८१२ पदे आहेत. त्यांची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत होती. त्यांची अद्यापही आवश्यकता असल्याने या पदांना आणखी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाने गृह विभागाकडे पाठविला होता. त्यानुसार या पदांना आणखी दोन वर्षांनी मुदतवाढ दिलेली आहे. या कालावधीत संबंधित घटक कार्यालयाच्या प्रशासकीय वर्गाकडून या पदाच्या पुर्ततेबाबतची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. अन्यथा संबंधित पदाचा वेतन व अन्य सवलतीपासून वचिंत रहावे लागणार आहे.

Web Title: Extension of 77 thousand temporary posts in the police department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.