'कुंभकोणींच्या व्हायरल बातमीचं स्पष्टीकरण, फडणवीसांनी सांगितलं राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 08:19 PM2020-09-17T20:19:31+5:302020-09-17T20:20:08+5:30

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशुतोष कुंभकोणी यांची एक बातमी व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच मला रोखले असा आशय असल्याचे या व्हायरल बातमीत दिसून येत आहे.

'Explanation of Kumbakoni's viral news, Fadnavis says politics on maratha reservation | 'कुंभकोणींच्या व्हायरल बातमीचं स्पष्टीकरण, फडणवीसांनी सांगितलं राजकारण'

'कुंभकोणींच्या व्हायरल बातमीचं स्पष्टीकरण, फडणवीसांनी सांगितलं राजकारण'

Next
ठळक मुद्देमराठा समाजाला आणि राज्यातील लोकांना हे माहिती आहे की समाजाच्या हितासाठी मी काय केलंय. हे असं चुकीच्या बातम्या पसरविण्याचं काम यशस्वी होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

मुंबई - मराठा आरक्षण प्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारने सांगितल्यानुसार मी युक्तिवाद केला नाही असं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आता म्हटलं आहे. ” तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितल्याप्रमाणे २०१९ च्या सुनावणीत आपण न्यायालयात बाजू मांडली नाही. असं असलं तरीही कागदोपत्री सरकारची बाजू भक्कम करण्याचे काम आपण यावेळी केलं” असंही कुंभकोणी यांनी म्हटल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत होती. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलताना स्पष्टीकरण दिलंय. तसेच, जाणीवपूर्वक हे पसरवलं जात असल्याचंही ते म्हणाले. 

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशुतोष कुंभकोणी यांची एक बातमी व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच मला रोखले असा आशय असल्याचे या व्हायरल बातमीत दिसून येत आहे. मात्र, मी असं का करेन असे म्हणत फडणवीस यांनी या घटनेचा खुलासा केलाय. ''वस्तुस्थिला विसंगत एखादी गोष्ट आपल्याला चालवता येईल याचं हे उदाहरण असल्याचं सांगत, आशुतोष कुंभकोणी यांच्या वक्त्व्याची बातमीच चुकीच्या पद्धतीने लिहिलेली असल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तसेच, त्या वृत्तात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं, त्यावेळी सोलापूरात मराठा परिषद झाली, त्यामध्ये महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याऐवजी माजी महाधिवक्ता थोरातसाहेब यांनी ही केस चालवावी, असा निर्णय घेण्यात आला. तशाप्रकारचे एक प्रेझेंटेशनही सरकारकडे आले, त्यावेळी स्वत: कुंभकोणी माझ्याकडे आले होते. कुंभकोणी यांनी स्वत: माझ्याशी बोलताना सांगितले की, मराठा समाजाचा विश्वासच माझ्यावर नसेल तर मला ते चालवणं कठीण जाईल. तसेच, माझ्यापेक्षा थोरात साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे आपण थोरात यांना ही टीम लीड करायला सांगितली पाहिजे, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

कुंभकोणी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही थोरात यांना बोलावलं, त्यांना विचारणा केली. त्यांच्या मान्यतेनंतरच ती टीम थोरात यांनी लीड केली. याप्रकरणी आपण दिल्लीचेही वकील आणले, माजी अधिवक्ता कदम यांचीही आपण मदत घेतली. कायदा बनविण्यापासूनची मदत कुंभकोणी यांनी केली, कोर्टातही ते मदतीला होते, पण कोर्टात ते उभारले नाहीत. कारण, समाजाच्या मागणीनुसार थोरात हे टीम लीड करत होते. थोरात यांच्या टीमने उच्च न्यायालयात ही केस जिंकली. मात्र, सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर या सरकारनेही हीच टीम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयातही थोरात यांनीच काम पाहिलं. 

कुंभकोणी यांनीही तेच सांगितलं होतं, पण काही जणांनी जाणीवपूर्वक तशा बातम्या दिल्या. चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केले, तुम्ही एखाद्याला कन्हीन्स करु शकत नसाल, तर त्यांना कन्फूज करा अशी थेअरी आपल्याकडे आहे.  मी असं बोलू नये, पण काही लोकांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी सर्व मारलं तर चालतं. काही लोकांकडून असा प्रयत्न नेहमीच केला जातो. पण, मराठा समाजाला आणि राज्यातील लोकांना हे माहिती आहे की समाजाच्या हितासाठी मी काय केलंय. हे असं चुकीच्या बातम्या पसरविण्याचं काम यशस्वी होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 
 

Web Title: 'Explanation of Kumbakoni's viral news, Fadnavis says politics on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.