"आपला अमोल"ला निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जीवाचे रान करेल सुभाष देसाई यांची ग्वाही
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 20, 2024 17:15 IST2024-03-20T17:15:03+5:302024-03-20T17:15:48+5:30
माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रचारात उतरले असून काल सायंकाळी त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

"आपला अमोल"ला निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जीवाचे रान करेल सुभाष देसाई यांची ग्वाही
मनोहर कुंभेजकर, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार दि,9 मार्च रोजी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा शाखांमधील भेटींमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहिर केली होती. आता या मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या तयारी साठी जोमाने तयारीला लागल्याचे चित्र आहे.आता शिवसेना नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई हे सुद्धा प्रचारात उतरले असून काल सायंकाळी त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांच्या अध्यक्षतेखाली अमोल कीर्तिकर यांच्यासाठी त्या मतदारसंघातील पक्षाच्या महिला व पुरूष पदाधिका-यांची एक बैठक काल सायंकाळी गोरेगाव पश्चिम येथील जवाहर नगर हॉल मध्ये पार पडली.
सगळ्या शिवसैनिकांना आपलासा वाटणारा "आपला अमोल" याला निवडून आणण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जीवाचे रान करेल हिच ग्वाही सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात दिली. या बैठकीला स्वतः अमोल कीर्तिकर यांच्या समवेत उपनेत्या व राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी व जिंकण्यासाठीची आपली मते मांडले.
सदर बैठकीला शिवसेना उपनेत्या राजूल पटेल,महिला विभाग संघटिका साधनाताई माने, समीर देसाई, माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर, तसेच मतदारसंघातील महिला पुरूष विधानसभा संघटक, समन्वयक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.