Join us  

CoronaVirus News: कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 1:11 PM

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मुंबई: कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

दरम्यान, कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (RTPCR टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसेलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असणार आहे.  

चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना रिपोर्ट सादर करावा लागेल. त्यांना प्रवासाच्या ९६ तास आधी ही   चाचणी करावी लागेल. तर रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. ज्या लक्षणे असलेल्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचार खर्च त्यालाच करावा लागणार आहे.

विमान प्रवाशांसाठी नियमावली

विमानतळावर उतरल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. ही चाचणी प्रवास सुरू करण्याच्या ७२ तासांत केलेली असावी.  तपासणी न केलेल्यांना विमानतळावर स्वखर्चाने  तपासणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तिथे तपासणी केंद्रे असेल.  तपासणीनंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. मात्र प्रवाशांना फोन क्रमांक, घराचा पत्ता द्यावा लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसनरेंद्र मोदी