कोरोना संकटादरम्यान वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्कफोर्सची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 07:45 PM2020-06-24T19:45:40+5:302020-06-24T19:46:29+5:30

वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी  राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यात आले आहे.

Establishment of a state-level task force to deal with transportation during the Corona Crisis | कोरोना संकटादरम्यान वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्कफोर्सची स्थापना

कोरोना संकटादरम्यान वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय टास्कफोर्सची स्थापना

googlenewsNext

मुंबई - कोविड-19 या  विष्णूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतूकीसंदर्भात  उपाययोजना करण्यासाठी  विविध माल वाहतूक संघटना  व नागरी परिवहन उपक्रमाच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री अँड अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यात आले आहे.

राज्यात कोविड-19 या विषाणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासन विविध उपाययोजना करत आहे  त्याच पार्श्वभूमीवर "mission Begin Again"  या अंतर्गत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी  राज्यस्तरीय कृतीदल स्थापन 
करण्यात आले आहे.

यात अपर मुख्य सचिव (परिवहन),सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक)मुंबई, उपाध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाव्यवस्थापक मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर,बस वाहतूक महासंघाचे प्रतिनिधी, विविध ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनाचे  प्रतिनिधी,अध्यक्ष महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, ओनर्स असोसिएशन मुंबई, वेब बेस्ड टॅक्सी (ओला, उबेरासह) चालक संघटनांचे प्रतिनिधी, बस अँन्ड कार ऑपरेटरर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया(इडउक)यांचे प्रतिनिधी, मुंबई बस मालक संघटनांचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून तर सदस्य सचिव म्हणून परिवहन आयुक्त यांचा समावेश आहे.

या राज्यस्तरीय कृतिदलाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतुकीशी संबंधित बाबी मुळे होणारा परिणाम, वाहतूक व्यवस्थेतील  येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून उपाय योजना करणे  आणि  परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणे.यासाठी या कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवार  दिनांक 26 जून रोजी दुपारी 12:30 वाजता  व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Web Title: Establishment of a state-level task force to deal with transportation during the Corona Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.