राज्यात 'कोरोना टास्क फोर्स'ची स्थापना, जेएन- 1’ घातक नाही, घाबरून न जाता काळजी घ्यावी; आरोग्य मंत्री सावंतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 09:28 AM2023-12-29T09:28:43+5:302023-12-29T09:30:18+5:30

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 'जेएन-1' या नव्या व्हेरियंटचे हे रुग्ण आहेत.

Establishment of 'Corona Task Force' in the state, JN-1 is not dangerous, should be careful not to panic; Appeal of Health Minister tanaji Sawant | राज्यात 'कोरोना टास्क फोर्स'ची स्थापना, जेएन- 1’ घातक नाही, घाबरून न जाता काळजी घ्यावी; आरोग्य मंत्री सावंतांचे आवाहन

राज्यात 'कोरोना टास्क फोर्स'ची स्थापना, जेएन- 1’ घातक नाही, घाबरून न जाता काळजी घ्यावी; आरोग्य मंत्री सावंतांचे आवाहन

मुंबई- देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 'जेएन-1' या नव्या व्हेरियंटचे हे रुग्ण आहेत. राज्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, यासाठी आता 'टास्क फोर्स'ची स्थापन केली असून टास्क फोर्सची पहिली बैठक गुरुवारी २८ डिसेंबर रोजी झाली. ही बैठक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.

सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण 

 ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी साथी आणि संसर्गजन्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुढील १० ते १५ दिवस सतर्क रहा

‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच याबाबत ‘मॉक ड्रील’  राहीलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रूग्णालयांमध्ये ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते योग्य उपचार करावेत. नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतील, त्यामुळे हा विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे पुढील १० ते १५ दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सूचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. 

लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्या

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले की, जेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.  उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली, तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही बैठकीत आपले मत व्यक्त केले.

Read in English

Web Title: Establishment of 'Corona Task Force' in the state, JN-1 is not dangerous, should be careful not to panic; Appeal of Health Minister tanaji Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.