"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका

By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 09:48 AM2020-11-22T09:48:25+5:302020-11-22T09:54:44+5:30

Sanjay Raut News : महाराष्ट्रातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता.

"Enemies of the people who linking Hindutva to the Corona War" Sanjay Raut Criticize BJP | "कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका

"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात भाजपा पुढारी कोरोनाचे राजकारण करत आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजेभाजपा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाहीमुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे.. पण त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही

मुंबई - कोरोना आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर पुन्हा एकदा रोखठोक टीका केली आहे. महाराष्ट्रातीलभाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता. बिहारात विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल, असे कोणाला वाटते काय. कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी आजच्या सामनामधील रोखठोक सदरातून केला आहे.

या लेखात संजय राऊ म्हणतात की, राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषण आणि कोरोनाचीच लाट आहे. अमित शाह कोरोनातून बाहेर पडलेत. पण काँग्रेसचे नेते अहमद पटेल मेदांता रुग्णालयात कोरोनाशी झुंजत आहेत. राजधानीत कोरोना वाढत आहे. राजधानीत कोरोाचे संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते. ज्यांनी आपल्या स्वकीयांना आप्तांना या दहा दिवसांत गमावले त्यांना सराकार काय उत्तर देणार असा सवाल दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला विचारला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात भाजपा पुढारी कोरोनाचे राजकारण करत आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे.

महाराष्ट्रातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी निरंकूश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतीनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी यामागणीसाठी भाजपावाले आंदोलन करत होते. भाजपा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाही. गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने छठपूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते कसे विसरतात. बिहारमध्येही छठपूजा घरच्याघरी करण्याचे आदेश प्रशासनाने काढले होते. हे सर्व करताना भाजपा हिंदुत्वविरोधी ठरत नाही, पण महाराष्ट्रात भाजपाची भूमिका वेगळी. भाजपा नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते ते कोणत्या आधारावर? मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे.. पण त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.


महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता. बिहारात विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल, असे कोणाला वाटते काय. कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ती वेळ येऊ नये. भाजपासारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव म्हटले पाहिजे, असे राऊत या लेखात म्हटले आहे.

देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहा यावर काहीच जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत. देशाच्या राजधानीत कोरोनाची लाट उसळली आहे आणि तिथे भाजपाचे सरकार नाही म्हणून अक्षम्य दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही. बिहार जिंकले. आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपाने ठरवले असेत तर तो त्यांचा प्रश्न. पण खरे संकट कोरोना आणि घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे आहे. त्यावर कधी विजय मिळवायचा? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळ्यांदेखत लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल, असा टोलाही राऊत यांनी मोदींना लगावला आहे.

Web Title: "Enemies of the people who linking Hindutva to the Corona War" Sanjay Raut Criticize BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.