नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 08:18 IST2025-10-12T08:18:31+5:302025-10-12T08:18:49+5:30
सुरक्षा चाचण्या, जोडकामासाठी घेण्यात आला निर्णय...

नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
मुंबई : मेट्रो २ अ म्हणजेच दहिसर पूर्व ते डीएन नगर आणि मेट्रो ७ म्हणजेच गुंदवली ते ओवरीपाडा यादरम्यान १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान ५ वाजून २५ मिनिटांऐवजी ७ वाजता म्हणजेच दीड तास उशिराने सुरू होणार आहे.
गुंदवली ते ओवरीपाडा (मेट्रो ७) ला दहिसर पूर्व ते काशिगाव (मेट्रो ९ / पहिला टप्पा) शी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान अखंड व सुसंगत प्रवासासाठी ही तात्पुरती वेळापत्रकातील सुधारणा अत्यावश्यक आहे. सध्या मेट्रो मार्गिका ७ वर १३ स्थानकांदरम्यान सेवा सुरू असून, मार्गिका ७ ची विस्तारित मार्गिका ९ चे काम अंतिम टप्प्यात आहे.
अखंड मेट्रोसेवा मिळणार
प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा) सुरु करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. लवकरच गुंदवली ते मीरा गाव दरम्यान थेट, सुसंगत आणि अखंड मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रोकडून देण्यात आली.
प्रवासाचे नियोजन करताना मुंबई ॲप, महा मुंबई मेट्रोचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व स्थानकावरील माहिती फलकावरील वेळापत्रक तपासावे, असे आवाहन केले आहे.
डहाणूकरवाडीहून -
अ) गुंदवलीकडे पहिली मेट्रो
१) सोमवार ते शुक्रवार –
स. ७:०१ वाजता
२) शनिवार – स. ७:०० वाजता
३) रविवार – स. ७:०४ वाजता
ब) अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
१) सोमवार ते शुक्रवार –
स. ७:०६ वाजता
२) शनिवार – स. ६:५८ वाजता
३) रविवार – स. ६:५९ वाजता
अंधेरी पश्चिमहून
अ) गुंदवलीकडे पहिली मेट्रो
१) सोमवार ते शुक्रवार – स. ७:०१ वाजता
२) शनिवार – स. ७:०२ वाजता
३) रविवार – स. ७:०४ वाजता
दहिसर पूर्वहून -
अ) अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
१) सोमवार ते शुक्रवार –
स. ६:५८ वाजता
२) शनिवार – स. ७:०२ वाजता
३) रविवार – स. ७:०२ वाजता
ब) गुंदवलीकडे पहिली मेट्रो
१) सोमवार ते शुक्रवार –
स. ६:५८ वाजता
२) शनिवार – स. ७:०६ वाजता
३) रविवार – स. ७:०१ वाजता
गुंदवलीहून पहिली मेट्रो
अ) अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो
१) सोमवार ते शुक्रवार – स. ७:०६, वाजता
२) शनिवार – स. ७:०२ वाजता
३) रविवार – स. ७:०० वाजता