Emotional Video: 'त्या' खास लोकांसाठी आज काढूया पाच मिनिटांचा वेळ; 'लोकमत'ची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 11:56 AM2020-03-22T11:56:49+5:302020-03-22T11:57:10+5:30

कोरोनाच्या तिसऱ्या व अतिशय संवेदनशील टप्प्यावर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे.

Emotional Video: Let's take five minutes today for 'those' special people; Lokmat appealing vrd | Emotional Video: 'त्या' खास लोकांसाठी आज काढूया पाच मिनिटांचा वेळ; 'लोकमत'ची साद

Emotional Video: 'त्या' खास लोकांसाठी आज काढूया पाच मिनिटांचा वेळ; 'लोकमत'ची साद

Next

कोरोना विषाणूचा अत्यंत झपाट्याने फैलाव होताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी देशवासीयांना रविवारी म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्यास सांगितलंय. कोरोनाच्या तिसऱ्या व अतिशय संवेदनशील टप्प्यावर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे.

‘लोकमत’ही मोदी सरकारच्या या प्रयत्नांच्या पाठीशी उभे आहे. लोकांनी स्वत:हून संचारबंदीत सहभागी व्हावे. सरकार, प्रशासन व पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, दूधवाला, कचरावेचक, सकाळी रोज घराघरांत जाऊन पेपर टाकणारे हे सारे आपल्यासाठी झटत आहेत. पाच मिनिटांचा वेळ काढून थाळी नाद, घंटानाद, शंखनाद करून ही महत्त्वाची भूमिका बजावू या. अशा व्यक्तींच्या कामगिरीला सलाम करायला हवा. कोरोनाविरुद्धच्या युद्धात प्रत्येकाने सैनिकाप्रमाणे लढू या आणि पाच मिनिटांचा वेळ काढू या. 

Web Title: Emotional Video: Let's take five minutes today for 'those' special people; Lokmat appealing vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.