मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:52 IST2025-09-10T16:50:34+5:302025-09-10T16:52:37+5:30
अलीकडेच शिंदेसेनेने मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या होत्या.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
मुंबई - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील काही महिन्यात मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यात पक्षाला यश मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.
महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे.
अशी असेल शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती
१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
२) रामदास कदम, नेते
३) गजानन कीर्तीकर, नेते
४) आनंदराव अडसूळ, नेते
५) मीनाताई कांबळे, नेत्या
६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
७) रवींद्र वायकर, खासदार
८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार
९) राहुल शेवाळे, माजी खासदार
१०) संजय निरुपम, माजी खासदार
११) प्रकाश सुर्वे, आमदार
१२) अशोक पाटील, आमदार
१३) मुरजी पटेल, आमदार
१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार
१६) मंगेश कुडाळकर, आमदार
१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
१८) सदा सरवणकर, माजी आमदार
१९) यामिनी जाधव, माजी आमदार
२०) दीपक सावंत, माजी आमदार
२१) शिशिर शिंदे, माजी आमदार
अलीकडेच शिंदेसेनेने मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या होत्या. मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यात आतापर्यंत ६० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्याशिवाय पुढील काही दिवसांत आणखी माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करतील असा दावा नेते करत आहेत. मुंबई महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता राहिली आहे. परंतु पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी शिंदेसेना मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत करत आहे.