Join us

आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; सत्तासंघर्षात राष्ट्रवादीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 19:22 IST

या बैठकीला काही आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते तर दोन आमदार कामानिमित्त उपस्थित नव्हते अशी माहितीही अजित पवार यांनी दिली

मुंबई - महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊन आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. 

या बैठकीला काही आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते तर दोन आमदार कामानिमित्त उपस्थित नव्हते अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. या बैठकीनंतर अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा असून यासंदर्भात काल आणि आज बोललो आहे त्यामुळे यापेक्षा राष्ट्रवादीची वेगळी भूमिका नाही. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात गेलेले दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी जे काही घडले ते सांगितले आहे. जे इथे नाहीत त्यांना परत येण्याचे आवाहन उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींवर व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आघाडी सरकार टिकवण्याची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले. 

मी दुजाभाव केला नाही, जर...; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर

तसेच सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्यावर आम्हाला टीका करायची नाही. शिवसेनेच्या भूमिकेमुळे आम्ही सरकारमध्ये आहोत. शिवसेनेने ते वक्तव्य का केले माहिती नाही. आम्ही त्यावर भूमिका मांडणार नाही. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर कसं पडू यासाठी एकत्र प्रयत्न करत आहोत. शिवसेनेचे प्रवक्ते काही बोलतात हा त्यांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. इतकेच नाही तर २५ वर्ष चालेल असंही बोलले होते. त्यांनी हे विधान का केले माहिती नाही. आम्ही उद्धव ठाकरेंना याबाबत विचारू, तुमच्या मनात दुसरं काय आहे का? कदाचित बंडखोरांना परत बोलवण्यासाठी हे विधान केले असावे असाही खुलासा अजित पवारांनी केला.  

कधीही दुजाभाव केला नाहीमित्रपक्ष वेगळ्या प्रकारे विधान करत आहेत. सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले. ३६ पालकमंत्री नेमले, प्रत्येकाला समसमान वाटप केले. निधीमध्ये कुठेही कपात केली नाही. निधी वाटप सगळ्यांना झाले. मी कधीही दुजाभाव केला नाही. मी सगळ्यांना विकासकामात मदत करण्याची भूमिका माझी असते. मी सकाळी कामाला सुरूवात करून बैठका घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मविआच्या बैठकीत काही तक्रारी केल्या असत्या तर समज-गैरसमज दूर झाले असते. सध्या महाविकास आघाडी कशी टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना दिले आहे. 

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे