दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 21:36 IST2022-09-13T21:34:19+5:302022-09-13T21:36:41+5:30
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत रंगला आहे.

दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक
राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत दसरा मेळावा कुठे घेतला जावा यावर चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी असल्याचंही समजतंय. आजच्या बैठकीत शिंदेकडून आमदारांना समज दिला जाण्याची शक्यता असल्याचीही माहिती समोर येतेय. दरम्यान, या बैठकीला धैर्यशील माने, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अब्दुल सत्तार, रवी फाटक, यामिनी जाधव, किरण पावसकर, सदा सरवणकर, राजेश क्षीरसागर, संजय राठोड, संदीपान भुमरे, दीपक केसरकर उपस्थित आहे. शिंदे गटाकडून आता दसरा मेळाव्याबाबत काय निर्णय घेतला जातोय हे पाहावं लागेल.
उद्धव ठाकरेंनीही ठणकावलं होतं
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत रंगला आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यावर आपलाच हक्क दाखवला असून सध्या हा विषय सध्या कागदांत अडकला आहे. या वादावर उद्धव ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडली होती. तसेच, शिवतिर्थावर दसरा मेळावा आपलाच होणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. आता, मोठी जबाबदारी निष्ठावंतांवर आहे, आपल्याला मिळून ही लढाई लढायची आहे, असेही उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना सांगितलं.