कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:54 IST2025-10-28T13:53:47+5:302025-10-28T13:54:44+5:30

आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने छठ पूजेचे आयोजन करत आहात. सर्वजण एकत्रितपणे एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सणाची शोभा वाढते असं शिंदे यांनी म्हटलं.

Eknath Shinde interacts with North Indians in Mumbai on Chhath Puja; Target to Uddhav Thackeray | कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला

कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला

मुंबई - शहर आणि उपनगरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोकांकडून छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडून आयोजित छठ पूजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले. तिथे त्यांनी जमलेल्या उत्तर भारतीयांशी संवाद साधला. कैसन बा...ठीक बा असं म्हणत शिंदेंनी उत्तर प्रदेश आणि बिहारी जनतेला छठपूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी जेव्हा मुख्यमंत्री बनलो, त्याआधी अनेक सण उत्सव बंद होते. मंदिर बंद होती मात्र मी आल्यानंतर सर्वात आधी गोविंदा उत्सव आला त्यात सर्व निर्बंध हटवून धुमधडाक्यात साजरा करा असं मी सांगितले. गणपती उत्साहात साजरे केले गेले. उंचीवरील निर्बंध हटवले. आम्ही आल्यानंतर कोविडला पळवून लावले. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने छठ पूजेचे आयोजन करत आहात. सर्वजण एकत्रितपणे एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सणाची शोभा वाढते. या उत्सवात सहभागी होणे, त्याचे आयोजन करणे हे मोठे काम आहे ते संजय निरुपम यांनी केले आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच बिहारमध्ये सध्या निवडणुका सुरू आहात. तुम्ही सोबत आहात ना...आपल्या भारत देशाला जगात नंबर एक करायचे आहे. त्यासाठी भारताच्या विकासात आपल्यासारख्या प्रत्येकाचे योगदान हवे. जसं महाराष्ट्र योगदान देत आहे तसे बिहारचेही योगदान हवे. त्यासाठी सर्वांनी एकच संकल्प करा, मोदींना पाठिंबा द्या. आम्ही सभा घेण्यासाठी तिथे जाणार आहोत. संजय निरुपम यांच्या नेतृत्वात तिथे प्रचाराला जाऊ. आम्ही मुंबईचा विकास करत आहोत. पुढच्या एक वर्षात रस्त्यावर खड्डे सापडणार नाही. सगळे रस्ते क्रॉक्रिंटचे करणार आहोत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. कोस्टल रोड, अटल सेतू आम्ही बनवले असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, छठ पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आपल्या आस्थेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. या पूजेद्वारे तुम्ही भारतीय संस्कृती पुढे नेत आहात. ठाणे, मुंबईसह राज्यभरात छठ पूजेचा जल्लोष अनुभवायला मिळत आहे. संजय निरुपम यांचे विशेष कौतुक करतो, कारण ते मागील २८ वर्षांपासून या पूजेचे आयोजन करत आहेत. महाराष्ट्रात विविध संस्कृतीचे लोक एकोप्याने राहतात. पूजेसाठी काही ठिकाणी कृत्रिम तलावही उभारण्यात आले आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

Web Title : एकनाथ शिंदे ने उत्तर भारतीयों से की बात, उद्धव ठाकरे पर साधा निशाना

Web Summary : एकनाथ शिंदे ने छठ पूजा समारोह में उत्तर भारतीयों का अभिवादन किया और उद्धव ठाकरे पर कटाक्ष किया। उन्होंने अपनी सरकार द्वारा त्योहारों पर प्रतिबंध हटाने पर प्रकाश डाला, एकता पर जोर दिया और मोदी के लिए समर्थन मांगा, मुंबई में विकास का वादा किया।

Web Title : Eknath Shinde greets North Indians, criticizes Uddhav Thackeray during Chhath Puja.

Web Summary : Eknath Shinde attended Chhath Puja celebrations, greeting North Indians and subtly criticizing Uddhav Thackeray. He highlighted his government's lifting of festival restrictions, emphasized unity, and solicited support for Modi, promising development in Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.