Eknath Shinde: मोठी बातमी! शिंदे गट उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?; माजी आमदार, नगरसेवकांना करताय संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:48 AM2022-06-24T11:48:41+5:302022-06-24T11:51:36+5:30

Eknath Shinde: मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या माजी आमदार आणि नगरसेवकांना संपर्क करण्यात येत आहे.

Eknath Shinde: Former Shiv Sena MLAs and corporators are being contacted by Minister Eknath Shinde's group. | Eknath Shinde: मोठी बातमी! शिंदे गट उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?; माजी आमदार, नगरसेवकांना करताय संपर्क

Eknath Shinde: मोठी बातमी! शिंदे गट उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार?; माजी आमदार, नगरसेवकांना करताय संपर्क

googlenewsNext

मुंबई/ गुवाहाटी: भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात असताना एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. 

आमदार फोडल्यानंतर आता पक्षात उभी फूट पाडण्याची तयारी शिंदे गटाकडून होत आहे. त्यासाठी माजी आमदार, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत शिंदे गटाकडून संपर्क साधला जात आहे. तसेच शिवसेनेतील काही माजी आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्काच असल्याचे बोलले जात आहे. 

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात शिंदे गटाकडून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेचाही दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. 

'तुम्हाला उद्धव ठाकरेंनीच गुवाहाटीला पाठवलंय का?'; एकनाथ शिंदे मोघमच बोलले!

शिवसेनेकडून १२ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बैठकीला उपस्थित राहिलो नाही, म्हणून तुम्ही आमदारकी रद्द करण्याची मागणी करताय..असं कधी होतं का?, बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

तुम्हाला उद्धव ठाकरेंनीच गुवाहाटीला पाठवलंय का?

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच हात असल्याचे सांगण्यात येत हे. सध्या जे काही सुरु आहे, ती शिवसेनेचीच खेळी आहे. उद्धव ठाकरे यांनीत एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना गुवाहटीला पाठवल्याची चर्चाही रंगली आहे, असा सवाल माध्यमांनी विचारला. त्यावर मला या चर्चांबाबत काही माहिती नाही, असं एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता असलेले आमदार-

१) आदित्य ठाकरे २) अजय चौधरी ३) रमेश कोरगावकर ४) उदय सामंत ५) वैभव नाईक ६) रवींद्र वायकर ७) उदयसिंह राजपूत ८) संतोष बांगर ९) भास्कर जाधव १०) सुनील राऊत ११) राजन साळवी १२) दिलीप लांडे १३) नितीन देशमुख १४) कैलास पाटील १५) राहुल पाटील १६) सुनील प्रभू १७) प्रकाश फातर्पेकर १८) संजय पोतनीस.

Read in English

Web Title: Eknath Shinde: Former Shiv Sena MLAs and corporators are being contacted by Minister Eknath Shinde's group.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.