Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेतील खासदारांना आपल्या पक्षात ओढण्याचे शिंदे यांचे प्रयत्न; आदित्य ठाकरेंकडून इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:56 IST

शिंदे हे आमची काळजी करतात, वेळप्रसंगी निधी देतात; खासदाराचे विधान

मुंबई : उद्धवसेनेतील खासदारांना पक्षात आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एनडीतील आपली ताकद वाढविण्याचा शिंदे यांचा प्रयत्न त्यामागे असल्याचे मानले जाते.

शिंदेसेनेचे सात, तर उद्धवसेनेचे नऊ खासदार आहेत. शिंदे अलीकडे दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी उद्धवसेना व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदारांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते. त्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी खासदारांना बोलावून घेतले होते. त्यावेळी शिंदे हे आमची काळजी करतात, वेळप्रसंगी निधी देतात, असे विधान एका खासदाराने ठाकरेंसमक्षच केल्याचे म्हटले जाते.

अधिकची मंत्रिपदे मागण्यासाठी धडपड

सध्या एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वाधिक खासदार हे तेलुगू देसम पक्षाचे आहेत. त्यापेक्षा जास्त खासदार आपल्याकडे असले तर एनडीएमधील आपले वजन वाढेल, केंद्रात अधिकची मंत्रिपदे मागता येतील आणि २०२९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अधिकच्या जागा लढण्यासाठी मागून घेता येतील, असे शिंदे यांचे गणित असल्याचे म्हटले जाते. पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसणार नाही इतके उद्धवसेनेचे खासदार आमच्यासोबत यायला कधीही तयार आहेत, असा दावा शिंदेसेनेचे नेते खासगीत बोलताना करतात. शिंदे यांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यावरून उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि दुसरे नेते आदित्य ठाकरे यांच्यात मतभेद असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आपल्या पक्षाला राज्यसभेची जागा मिळायला हवी, असा आदित्य यांचा आग्रह होता, तर खा. राऊत हे पवार यांना संधी देण्याच्या बाजूचे होते असे म्हटले जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's attempts to woo Uddhav Sena MPs, Aditya Thackeray denies.

Web Summary : Eknath Shinde is reportedly trying to attract Uddhav Sena MPs to strengthen his position in NDA. Aditya Thackeray opposed Rajya Sabha seat for Pawar.
टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेआदित्य ठाकरे