एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 04:31 IST2025-05-16T04:29:40+5:302025-05-16T04:31:31+5:30

एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्वत:च काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, हा प्रवेश होऊ शकला नव्हता.

eknath khadse likely to join of bjp again chandrashekhar bawankule meets | एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण

एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला असून, त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची गुरुवारी येथे भेट घेतली. ही भेट राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. 

खडसे भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्वत:च काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, हा प्रवेश होऊ शकला नव्हता. मग स्वत: खडसे यांनीही ते शरद पवार गटातच राहणार असल्याचे सांगितले होते. 

 

Web Title: eknath khadse likely to join of bjp again chandrashekhar bawankule meets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.