व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

By मनोज गडनीस | Published: May 3, 2024 08:39 PM2024-05-03T20:39:05+5:302024-05-03T20:39:24+5:30

पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

ed raids in kolhapur pune nashik in vips case assets worth rs 5 crore seized | व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

व्हीआयपीएस प्रकरणी कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ईडीचे छापे- ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मनोज गडनीस, मुंबई - सामान्य गुंतवणूकादारांकडून तब्बल १२५ कोटी रुपये गोळा करून ते बनावट कंपन्यांच्या माध्यमातून लंपास करणाऱ्या व्हीआयपीएस समुहाशी संबंधित चार कंपन्यांवर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) छापेमारी करत पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

यामध्ये रोख रक्कम, मुदत ठेवी व दागिन्यांचा समावेश आहे. पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या तीन शहरांत ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. प्राप्त माहितीनुसार, पुणे व अहमदनगर येथून आर्थिक गुंतवणुकीचे व्यवहार करणाऱ्या व्हीआयपीएस या कंपनीने या परिसरातील अनेक सामान्य गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये गोळा केले होते. मात्र, हे पैसे या गुंतवणूकदारांना कधीच परत मिळाले नाहीत.

या उलट संबंधित कंपनीचा मालक दुबईत गेल्याचे त्यांना समजले. या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मनी लॉड्रिंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Web Title: ed raids in kolhapur pune nashik in vips case assets worth rs 5 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.