गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात ईडीची कारवाई; मुंबईतील प्लॅट केले जप्त, काय आहे संपूर्ण प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 10:32 IST2024-12-24T10:30:20+5:302024-12-24T10:32:08+5:30
गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात ईडीने कारवाई केली आहे, ठाण्यातील फ्लॅट जप्त केले आहेत, तर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात ईडीची कारवाई; मुंबईतील प्लॅट केले जप्त, काय आहे संपूर्ण प्रकरण?
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याच्यासंबंधीत ठाण्यातील फ्लॅट जप्त केला आहे. ही संपत्ती खंडणीच्या माध्यमातून घेण्यात आली होती. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ठाण्यातील एक फ्लॅट जप्त केला आहे. कावासर येथील निओपोलिस टॉवरमध्ये असलेला हा फ्लॅट मार्च २०२२ पासून तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आला होता.
अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश
या प्रकरणी २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत ही मालमत्ता खंडणीच्या माध्यमातून घेतल्याचे उघड झाले. २०२२ मध्ये चौकशीनंतर ईडीकडून अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. २०१७ मध्ये ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने गुन्हा दाखल केला होता.
इक्बाल कासकार आणि त्याचा साथीदार मुताज शेख आणि इशरार सईद व्यापाऱ्यांकडून संतत्ती वसूल केल्या होत्या. बिल्डरांवर दबाव टाकून मुमताज शेख याच्या नावावर रजिस्टर करण्यात आले होते. या मालमत्तेची किंमत ७५ लाख रुपये आहे.
२०२२ मध्ये तपास यंत्रणेने पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते, हे ठाणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित होते. यात खंडणीपासून अनेक गंभीर आरोपांचा समावेश होता.