चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:23 AM2024-01-29T10:23:26+5:302024-01-29T10:26:24+5:30

कारच्या फास्ट टॅगचे केवायसी तातडीने करणे आवश्यक आहे.

Drivers pay attention did you fastag done then hurry up it will be closed after 31 in mumbai | चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद

चालकांनो लक्ष द्या! फास्टॅग केवायसी केले का? ३१ नंतर होईल बंद

मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार वापरकर्त्यांना 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' धोरणाचा अवलंब करावा लागेल आणि त्यांच्या बँकांद्वारे यापूर्वी एकापेक्षा अधिक जारी केलेले सर्व फास्टॅग हटवावे लागतील. कारच्या फास्ट टॅगचे केवायसी तातडीने करणे आवश्यक आहे. ते न केल्यास ३१ जानेवारीनंतर हे फास्टॅग बंद होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे उल्लंघन करून एका विशिष्ट वाहनासाठी एकाधिक फास्टंग जारी केले जात असल्याच्या आणि केवायसीशिवाय फास्टॅग जारी केल्याच्या अलीकडील अहवालानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे पाऊल उचलले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची सूचना 'एक वाहन, एक फास्टॅग' अंतर्गत जारी केली आहे. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरण्याच्या किंवा एका

विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडण्याच्या वापरकर्त्याच्या वर्तनाला परावृत्त करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अशा स्थितीत, आता वापरकर्त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या नवीन फास्टॅगचे केवायसी पूर्ण केले आहे, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ नवीनतम फास्टॅग खाते सक्रिय राहील. निवेदनात असेही निदर्शनास आणले आहे की, फास्टॅग काहीवेळा मुद्दाम वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जात नाही, परिणामी टोल प्लाझावर अनावश्यक विलंब आणि गैरसोय होते.

टोलवर दुप्पट कर :

फास्टॅगशिवाय तुम्हाला टोलवर दुप्पट कर भरावा लागेल. या संदर्भात माहितीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग वापरकर्त्यांना जवळच्या टोल प्लाझा, जारी करणाऱ्या बँकांच्या टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. वापरकर्त्यांना केवायसी फास्टॅगवर अपडेट केले आहे याची खात्री करावी लागेल.

अशी करा केवायसी :

• फास्टॅग केवायसी ऑनलाइन अपडेट करण्यासाठी वापरकत्यनि खालील निर्देशांचे पालन करावे.

• आयएचएमसीएल फास्टॅटेंग पोर्टलला भेट द्या.

• केवायसी स्थिती तपासा. आता, 'केवायसी' टॅबवर क्लिक करा आणि 'कस्टमर टाईप निवडा.

• अॅड्रेस प्रूफ दस्तऐवजांसह आयडीसह माहिती प्रविष्ट करा.

Read in English

Web Title: Drivers pay attention did you fastag done then hurry up it will be closed after 31 in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.