कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:45 IST2025-01-11T13:31:42+5:302025-01-11T13:45:51+5:30

विक्रोळीत पुन्हा एकदा बेस्ट बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

Driverless BEST bus accident in Vikhroli Two injured | कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी

कंट्रोल रुममध्ये जाण्यासाखी खाली उतरला बेस्टचा चालक; बस थेट चहाच्या दुकानाला धडकी, दोघे जखमी

Vikhroli BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या जखमा अद्याप भरलेल्या नसताना विक्रोळीत पुन्हा एकदा बस चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कुर्ला बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर बेस्टमध्ये चालकांनी मद्यपान करुन बस चालवल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. मात्र आता आणखी एका बेस्ट चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन नागरिक जखमी झाले आहेत. मात्र जास्त वर्दळ नसल्याने मोठा अपघात टळला आहे.

कुर्ला अपघातानंतरही बेस्ट बसच्या अपघाताच्या घटना सुरुच आहेत. विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात बस स्थानकात चालकाशिवाय सुरु असलेल्या  बसने अचानक एका टी स्टॉलला धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आलीय. 

कन्नमवार नगरमधल्या बेस्ट बस स्थानकात बस आल्यानतंर चालक बस तशीच सुरू ठेवून नियंत्रण कक्षात निघून गेला. यानंतर बस अचानक सुरू झाली आणि एका टी स्टॉलला जाऊन धडकली. विनाचालक बस पुढे गेल्याने सर्वांनी आश्चर्य केलं. बस पुढे जातात तिथे गोंधळ निर्माण झाला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बऱ्याच लोकांचा सुट्टीचा दिवस असल्याने मोठा अपघात टळला. बस स्टॉपवर चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्यासाठी मोठी गर्दी असते.

दरम्यान, कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. अपघातानंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर मोरे याने जामिनासाठी अर्ज केला. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. व्ही.एम. पाठाडे यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. मोरेला जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो, अशी भीती सरकारी वकिलांनी व्यक्त केली होती.

Web Title: Driverless BEST bus accident in Vikhroli Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.