सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 06:02 AM2024-03-16T06:02:04+5:302024-03-16T06:02:54+5:30

असा असेल ड्रेस कोड, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. 

dress code for teachers in all schools | सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. 

सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते, त्याच धर्तीवर शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर आणि मराठीत टी असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. 

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही मंत्री केसरकर यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. सर्व शाळांमध्ये राज्यगीत वाजविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले.

शिक्षक हा भावी पिढी घडवित असतो. विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असल्याने शिक्षकांनी घातलेल्या पेहरावाचा त्यांच्या मनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे शिक्षकांचा पोशाख हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून असला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शाळांनी ठरवावा पेहरावाचा रंग 

पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरुष शिक्षकांच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा. पुरुषांना शूज घालावे लागणार आहेत. वैद्यकीय कारण असेल तर बूट घालण्यापासून सूट देण्यात येईल. 

असा असेल ड्रेस कोड 

- महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असावा. 
- पुरुष शिक्षकांनी शर्ट-ट्राउझर पँट घालावी. शर्ट इन असावा. 
- गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत. 
- शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये. 

 

Web Title: dress code for teachers in all schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.