मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीवर जाऊ नका, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:46 IST2025-06-11T09:45:47+5:302025-06-11T09:46:10+5:30

Mumbai Metro Railway News: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो मार्ग ३ वर ‘रुपे एनसीएमसी’ कार्ड तयार केले. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले.

Don't go to the window for metro tickets anymore, 'National Common Mobility Card' unveiled | मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीवर जाऊ नका, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चे अनावरण

मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीवर जाऊ नका, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चे अनावरण

मुंबई - मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो मार्ग ३ वर ‘रुपे एनसीएमसी’ कार्ड तयार केले. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. या नवीन सुविधेमुळे आता प्रवासी आरे जे. व्ही. एल. आर. ते आचार्य अत्रे चौकादरम्यान हे कार्ड वापरून प्रवास करू शकतील. यामुळे तिकीट खिडकीवर रांग लावण्याची गरज नाही. आज, बुधवार सकाळी ११ वाजल्यापासून ही सेवा उपलब्ध होईल.

नवीन कार्ड आरे जे. व्ही. एल. आर. ते आचार्य अत्रे चौकादरम्यानच्या कोणत्याही स्थानकावर उपलब्ध आहे. हे कार्ड मोफत दिले जात आहे. मात्र वापरासाठी १०० ते २००० पर्यंत टॉप-अप करणे आवश्यक आहे.

मेट्रो मार्ग ३ सोबतच मार्ग २ अ, ७ आणि मार्ग १ वर हे कार्ड वापरता येईल. इतर मेट्रो मार्ग व चलो बससारख्या ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सनी उपलब्ध करून दिलेले कार्डही मेट्रो मार्ग ३ वर वापरता येईल. हे कार्ड इतर वाहतूक सुविधा, जसे की बेस्ट बस तसेच विविध मेट्रो मार्गच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने व  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.

Web Title: Don't go to the window for metro tickets anymore, 'National Common Mobility Card' unveiled