शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने त्यांना आज देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान "महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू," असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. यासंदर्भात आता उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले राऊत? -राऊत म्हणाले, "देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभ संदेश पाठवले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबरोबरचा फोटो स्वतःचा फोटो ट्विट करून, बाळासाहेब हे कसे आपले मार्गदर्शक होते. आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली? आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली? त्यांनी देशाला, महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली? असे म्हणत शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहिली. त्याच मोदींनी त्याचं बाळासाहेबांची शिवसेना तोडली, फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा मार्गदर्शन घेतात का? असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे." अशा शब्दांत राऊतांनी पंतप्रथान मोदींना टोला लागवला.
राऊत पुढे म्हणाले, "बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहतात किंवा आदरांजली वाहतातना, ते वहायलाच पाहिजे. अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना आज आदरांजली वाहिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते. मी कालच असे म्हणालो की लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते."
राऊत म्हणाले, "बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला. तो म्हणजे भक्कम एकजुटीचा. मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल, ऐक्याची वज्रमूठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवलं. बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर बनवलं. त्याला त्यांचं न्याय, हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली. अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्या सारख्याना सदैव होत असतं आणि महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार नाही."
दरम्यान, आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा शन्मुखानंद हॉलला होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Web Summary : Sanjay Raut criticizes Modi for paying tribute to Balasaheb Thackeray while allegedly orchestrating the split in Shiv Sena and installing Eknath Shinde. He questions if Modi now seeks guidance from Shinde, sparking public debate. Raj Thackeray will attend Balasaheb's birth centenary event.
Web Summary : संजय राउत ने मोदी पर बालसाहेब ठाकरे को श्रद्धांजलि देने के साथ शिवसेना में विभाजन कराने और एकनाथ शिंदे को स्थापित करने का आरोप लगाया। उन्होंने सवाल किया कि क्या मोदी अब शिंदे से मार्गदर्शन लेते हैं, जिससे सार्वजनिक बहस छिड़ गई। राज ठाकरे बालसाहेब की जन्म शताब्दी कार्यक्रम में शामिल होंगे।