दीड महिन्याच्या बाळाचा त्या डॉक्टरांनी वाचविला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:23 PM2020-05-20T19:23:06+5:302020-05-20T19:23:39+5:30

मध्यरात्री ३ वाजता साय्न्म्धील डॉक्टरांची कोरोना पॉझिटिव्ह बाळावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

The doctor saved the life of a one and a half month old baby | दीड महिन्याच्या बाळाचा त्या डॉक्टरांनी वाचविला जीव

दीड महिन्याच्या बाळाचा त्या डॉक्टरांनी वाचविला जीव

Next


मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दीड महिन्याच्या बाळावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या ६ जणांच्या टीमला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे हे बाळ काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्याने  संसर्गाच्या भीतीने बाळावर शस्त्रक्रिया कशी करायची हा देखील प्रश्न होता. मात्र, बाळाचा जीव वाचवणे ही आवश्यक असल्याने सोमवारी मध्यरात्री ३ वाजता सायन रुग्णालयातील ६ डॉक्टरांनी एकत्र येत ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

१३ मे या दिवशी कावीळ, सर्दी, ताप या लक्षणांमुळे सायन रुग्णालयात दाखल झाले होते. या बाळाला रक्त देखील चढवले गेले. मात्र, बाळ अत्यवस्थ होत गेले. त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. याच भीतीने डॉक्टरांनी त्या बाळाची कोरोना चाचणी केली आणि हे बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यावरील उपचार सूरू झाले मात्र बाळाची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर बाळाच्या मेंदुचे सीटीस्कॅन केले गेले. सीटीस्कॅनच्या अहवालात बाळाच्या मेंदुला गाठी झाल्याचे आढळले.  या बाळाच्या मेंदूत आणि आजूबाजुला रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. गाठी झाल्यामुळे मेंदूची संपुर्ण प्रक्रिया बिघडली होती. रक्त साखळण्याच्या प्रक्रियेत ही विलंब होत होता. त्या गाठी शस्त्रक्रियेशिवाय काढणे सोपे नव्हते. त्यामुळे, बाळावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते नाहीतर बाळाच्या जीवाला धोका होता. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आपली टिम बनवून या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया केल्याची माहिती  सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. या बाळावर शस्त्रक्रिया करताना योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती. पीपीई किट्स घालुन सर्व डॉक्टर्स सज्ज झाले होते. ४० मिलीमीटर एवढे पाणी (फ्लूड) या बाळाच्या मेंदूतून काढण्यात आले असल्याचे ही त्यांनी संगीतले.

 

बाल रोगतद्य, भुलतद्य, न्यूरोसर्जन, ओटी स्टाफ, अशा एकूण ६ जणांच्या टीमने मिळुन ही शस्त्रक्रिया पार पाडली. आता बाळाची प्रकृती स्थिर असून त्याची पुढील सगळी काळजी व्यवस्थितरीत्या घेत आहेत.
- डॉ. रमेश भारमल ,अधिष्ठाता, सायन रुग्णालय

 

Web Title: The doctor saved the life of a one and a half month old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.