ओळखलंत का सर मला, रतन टाटांनी फोटो शेअर केलेला तरुण कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 22:20 IST2020-01-23T22:18:51+5:302020-01-23T22:20:07+5:30
रतन टाटा यांनी आपल्या पोस्टवर एस मेसेजही लिहिला आहे.

ओळखलंत का सर मला, रतन टाटांनी फोटो शेअर केलेला तरुण कोण?
मुंबई - जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा हेही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच रतन टाटा यांनी इंस्ट्राग्रामवर एंट्री केली होती. गुरुवारी टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका तरुणाचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या इंस्ट्राग्रामवरील या पोस्टने युजर्संची मने जिंकली आहेत. कारण, हा फोटो स्वत: रतन टाटा यांचा असून लाँस अँजेलिस येथील आहे.
82 वर्षीय टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी काढलेला हा फोटो आहे. टाटा यांचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच, हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही हॉलिवूड स्टार असल्याचं वाटतंय, असे म्हणत नेटीझन्सने रतन टाटा यांचं कौतुक केलंय. यानंतर, टाटा यांनी अमेरिकेत शिक्षण घेऊन काही काळ काम केल्यानंतर सन 1962 साली भारतात येण्याचं ठरवलं. त्यानुसार ते भारतात परतले आणि आपल्या उद्योगात स्वत:ला झोकून दिलं.
रतन टाटा यांनी आपल्या पोस्टवर एस मेसेजही लिहिला आहे. हा फोटो ''मी बुधवारीचा शेअर करणार होतो. पण, कुणीतरी मला 'थ्रोबैक थर्सडे’ बद्दल सांगितले. म्हणून, हा लॉस अँजेलिसमधील फोटो शेअर केला'', असे रतना टाटा यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे. दरम्यान, त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला