तुम्हाला माहितीये का, या फोटोत किती मुख्यमंत्री आहेत?; रितेशचा चाहत्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:01 PM2024-01-02T20:01:30+5:302024-01-02T20:06:04+5:30

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक मुख्यमंत्र्यांनी योगदान दिलं आहे.

Do you know how many Chief Ministers are in this photo?; Riteish Deshmukh's question to the fans | तुम्हाला माहितीये का, या फोटोत किती मुख्यमंत्री आहेत?; रितेशचा चाहत्यांना सवाल

तुम्हाला माहितीये का, या फोटोत किती मुख्यमंत्री आहेत?; रितेशचा चाहत्यांना सवाल

मुंबई - महाराष्ट्राला मोठा राजकीय वारसा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजतागायत राज्याच्या जडणघडणीत अनेक बड्या नेत्याचं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, शाहू महाराज, महात्मा फुले यांचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. तर, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजपर्यंतच्या नेतेमंडळींचंही राज्याच्या विकासात भरीव काम राहिलं आहे. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनीही आपली कारकीर्द गाजवली होती. अभिनेता रितेश देशमुख हा त्यांचाच मुलगा. आज रितेशने त्याच अनुषंगाने एक फोटो ट्विट केला आहे. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक मुख्यमंत्र्यांनी योगदान दिलं आहे. त्यापैकी, बहुतांश नेते आज हयातीत नाही. तर, काही नेते आजही राजकारणात सक्रीय आहेत. अभिनेता रितेश देशमुख यांचे वडिल असलेला विलासराव देशमुख हेही महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. विलासराव यांनी १८ ऑक्टोबर १९९९ साली पहिल्यांदा महाराष्ट्राचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सन १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ असा जवळपास ८ वर्षे त्यांनी महाराष्ट्र राज्याचा कारभार सांभाळला आहे. 

विलासराव यांचा मुलगा असलेल्या अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्या, फोटोत सर्वच राजकीय नेतेमंडळी दिसून येतात. त्यामध्ये, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले अनेक चेहरे आहेत. त्यामध्ये, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले काँग्रेस नेते कमलनाथ यांचाही फोटो आहे. फोटोत एकूण ८ नेते दिसून येतात. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही आहेत. गुलाम नबी आझाद, किरण कुमार रेड्डी हेही मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, मुख्यमंत्री न बनलेले प्रफुल्ल पटेल, जयपाल रेड्डी आणि सुबिरामी रेड्डी हे तिघेही खासदार राहिले आहेत. तुम्हाला माहिती असेल तर या फोटोतील ८ पैकी किती जणांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कारभार सांभाळला होता, हे रितेशच्या ट्विटला कमेंट करुन सांगावे. 

Web Title: Do you know how many Chief Ministers are in this photo?; Riteish Deshmukh's question to the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.