Diwali 2025: मुंबईसह राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:53 IST2025-10-16T18:52:33+5:302025-10-16T18:53:34+5:30
Diwali Bonus Municipal Corporations Workers News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील तीन महानगपालिकांमधील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. याबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Diwali 2025: मुंबईसह राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील तीन महानगपालिकांमधील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. याबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
या घोषणेनुसार मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये, तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. तर ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सबंधित मनपा आयुक्तांना हे सानुग्रह कर्मचाऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे या तिन्ही महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना लवकरच हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.