शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 04:06 IST2025-05-15T04:05:29+5:302025-05-15T04:06:03+5:30
या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची बैठक बुधवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात पार पडली. स्थानिक निवडणुकीबाबत संबंधित जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्ह्यातील आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करून पक्षाची भूमिका ठरवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्ग आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शरद पवार गटाच्या बैठकीत निवडणूक तयारीवर चर्चा करून स्थानिक नेत्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या.