मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - कर्जत लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला सामान्य प्रवाशांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:22 IST2026-03-29T16:22:01+5:302026-03-29T16:22:34+5:30
सध्या, कुर्ला RPF चौकीमध्ये CR क्रमांक ४५२/२०२६ अन्वये, रेल्वे कायद्याच्या कलम १४५(B) अंतर्गत, लोकल ट्रेनमध्ये शिवीगाळ करणे, भांडण करणे आणि उपद्रव निर्माण करणे या आरोपांखाली एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी - कर्जत लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला सामान्य प्रवाशांकडून मारहाण
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला सामान्य प्रवाशांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. २७) CSMT-KJT लोकलमध्ये (CSMT वरून दुपारी १४.४५ वाजता सुटणारी गाडी), दिव्यांग राखीव डब्यामध्ये जागेवरून एक अंध प्रवासी आणि दुसऱ्या एका शारीरिकदृष्ट्या दिव्यांग प्रवाशाचा वाद झाला. या वादादरम्यान, एका महिला प्रवाशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या दिव्यांग प्रवाशाचा आणि त्या महिलेचा एकमेकांशी शाब्दिक वाद (शिवीगाळ) झाला. जेव्हा त्या महिला प्रवाशाचा अंदाजे १२-१४ वर्षे वयाचा मुलगाही या वादात सामील झाला, तेव्हा परिस्थिती अधिकच चिघळली होती. यानंतर संबंधित महिला प्रवासी आणि तिचा मुलगा कुर्ला स्थानकावर उतरले, तर संंबंधित दिव्यांग प्रवासी घाटकोपर स्थानकावर उतरला.
सध्या, कुर्ला RPF चौकीमध्ये CR क्रमांक ४५२/२०२६ अन्वये, रेल्वे कायद्याच्या कलम १४५(B) अंतर्गत, लोकल ट्रेनमध्ये शिवीगाळ करणे, भांडण करणे आणि उपद्रव निर्माण करणे या आरोपांखाली एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक (SI) संदीप काळे हे करत आहेत. संबंधित व्यक्तींकडून त्याला चालत्या ट्रेनमधून ढकलून देण्याची धमकी देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे.