तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश

By मनीषा म्हात्रे | Published: November 2, 2023 08:51 PM2023-11-02T20:51:43+5:302023-11-02T20:52:16+5:30

Mumbai Crime News: परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतराराजीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये ३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते.

Did you get an overseas job offer? Be careful if you come! Interstate gang busted | तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश

तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश

मुंबई  - परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतराराजीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये
३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. गुन्हे शाखेने या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे.

ट्रॉम्बे येथील रहिवासी असलेले भरत शांताराम कोळी (४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमितोश श्रवणकुमार गुप्ता(लखनौ) भिवंडीतील फैजान अहमद फारूख अहमद शेख, शेख मन्सुरी मोहम्मद, रामकृपाल रामसेवक कुशवाह यांच्यासह दलाल  प्रमोद कुमार, शुभम सिंह, अरुण सिंह, अजय चौहाणसह त्यांचा बॉस आणि अन्य कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एमआरए मार्ग पोलिसांच्या हद्दीतील शहीद भगत सिंग रोड परिसरात कार्यालयात थाटले होते. आरोपींनी १९ जून २०२३ ते २९ ऑकटोबर दरम्यान ही फसवणूक केली आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आंतरराज्यीय टोळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, भिवंडी व मुंबई येथुन आपसात संगनमत साधुन सक्रिय असल्याचे आढळून आले. त्यानुसार, पोलीस सह आयुक्तलखमी गौतम यांचे मार्गदर्शनाखाली एकुण ५ पोलीस पथके स्थापन करण्यात आली.  त्यांना दिल्ली, जिल्हा लखनौ, राज्य उत्तरप्रदेश, जिल्हा गया, राज्य बिहार, भिवंडी महाराष्ट्र येथे पाठविण्यात आले. या पथकांनी आरोपींचा शोध घेवून नमुद ठिकाणांहुन  ५ आरोपीना अटक केली आहे. रामकृपाल रामसेवक कुशवाह (४५, भिवंडी), रोहित महेश्वर सिन्हा (३३, मुंबई), आशिषकुमार माहतो (३०, दिल्ली), अमितेश गुप्ता (४०,लखनौ) आणि राहुलकुमार चौधरी (२२, बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहे.

अशी केली फसवणूक
त्यांनी बॉम्बे इन्टरनॅशनल कन्सलटन्सी या नावाने बनावट रजिस्टर क्रमांकाने कार्यालय उघडले. कोळी यांच्यासह ३० ते ४० जणांना अझरबैडान येथील पाशा कन्स्ट्रक्शन या कंपनीत नोकरी लावुन देतो असे सांगुन जाळ्यात ओढवले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ऑफर लेटर तसेच अझरबैझन या देशाचा बनावट वर्क व्हिझा तयार केला. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून कोळी यांच्याकडून ४० हजार तर, अन्य सभासदांकडून प्रत्येकी ३५ ते ६० हजार रुपये उकळले.  ठगांनी पैसे परत न देता तक्रारदारांसह अन्य तरुणांचे पासपोर्ट ताब्यात घेतले होते. ते परत करण्यासाठीही ५ ते १० हजारांची मागणी करण्यास सुरुवात केली. अखेर यात फसवणूक झाल्याचे समोर येताच तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

अंधेरीत नवीन कार्यालय...
या टोळीने बेरोजगार तरुणांना लक्ष्य केले होते. आरोपींच्या चौकशीत मुंबईत अंधेरी सहार परीसरात अशाच प्रकारे खोटे नविन नावाने विनापरवाना एजन्सी चालवून, अशाच प्रकारचा गुन्हा करत असल्याचे तपासात निष्पन्न होताच तेथेही छापा टाकुन पुढील फसवणूक टाळण्यास पोलिसांना यश आले.

६३ पासपोर्ट अन..
पोलिसांनी कारवाई करत यातील फसवणुकीची शिकार झालेल्या व्यक्तींचे ६३ पासपोर्टसह अझरबैझन देशाचे एकूण  ७ बनावट व्हिझा, स्टिकर्स व कागदपत्रे,  ५ संगणक व संगणकीय साहीत्य कलर प्रिंटर, ५ लॅन्डलाईन फोन व  ७ मोबाईल फोन इंटरनेट कनेक्शन राउटर, विविध कंपन्याचे १४ मोबाइल सीम कार्ड, विविध रबरी शिक्के,विविध बँकांचे १० डेबीट कार्ड, ०६ चेकबुक व पासबुक,ऑफर लेटर असे गुन्हयात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहेत.

Web Title: Did you get an overseas job offer? Be careful if you come! Interstate gang busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.