तुमच्या ‘त्या’ मित्राला धारावी गिळू देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 07:44 AM2023-10-25T07:44:09+5:302023-10-25T07:47:01+5:30

मुंबई तोडायचा प्रयत्न केला, तर सरकार जाळून टाकू

dharavi will not allow swallow to your friend uddhav thackeray warning to bjp | तुमच्या ‘त्या’ मित्राला धारावी गिळू देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

तुमच्या ‘त्या’ मित्राला धारावी गिळू देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धारावी विकासातून विकासकाला दीडशे कोटी चौरस फुटांचा एफएसआय मिळणार आहे. त्याला तो दक्षिण मुंबईत वापरता येणार आहे. तिथे सर्वसामान्यांसाठी घरे बांधणार आहात का, असा सवाल करताना, हा विकास केवळ तुमच्या मित्राचे खिसे भरण्यासाठी होऊ देणार नाही. तुमच्या मित्राला मी धारावी घेऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात बोलताना दिला.

अदानींचा उल्लेख न करता, त्यांनी धारावीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. धारावीकरांना हक्काचे घर तर मिळालेच पाहिजे, पण धारावीकरांच्या लघुउद्योगांना पण जागा मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्वसामान्य मराठी माणसाला परवडणारी घरे, त्याचप्रमाणे गिरणी कामगार, पोलिस आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधा, असे ते म्हणाले. भाजपसोबत शिंदे गटालाही फटकारत बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे का, असा सवाल त्यांनी शिवसैनिकांना केला. मुंबई तोडता येत नसल्याने दुसऱ्या मार्गाने मुंबई ताब्यात घ्यायचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई तोडायचा प्रयत्न केला, तर सरकार जाळून टाकू

मुंबईचा विकास महापालिकेच्या हातून काढून नीति आयोगाच्या ताब्यात द्यायचा. कोरोनात आम्ही अतुलनीय काम केले, त्याबद्दल स्वत:चे कपडे काढून फिरणारे दलाल आता आरोप करत असल्याचे त्यांनी सुनावले. जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू. मुंबई तोडायचा प्रयत्न केलात, तर तुमचे सरकार जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.

 

Web Title: dharavi will not allow swallow to your friend uddhav thackeray warning to bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.