शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:54 PM2020-07-11T17:54:58+5:302020-07-11T18:07:28+5:30

धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले

Dharavi made a name for itself globally as a role model in the fight against Corona, said the CM Uddhav Thackeray | शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

Next
ठळक मुद्देजागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतका झाला असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पण, या संकटात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्यात यश आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) याचे कौतुक केलं आहे. WHOचं हे कौतुक म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देणारे आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय" 

''आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं,'' या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. 


त्यांनी पुढे सांगितले की,''धारावीमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२% वर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे. @WHO  चे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला.''

ते पुढे म्हणाले की,'' जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेतलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देणारी आहे.'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral  

Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

धक्कादायक : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला झाला कोरोना

कपिल देव, गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला बेन स्टोक्स, नोंदवला विक्रम

Web Title: Dharavi made a name for itself globally as a role model in the fight against Corona, said the CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.