करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:16 IST2025-04-09T13:39:39+5:302025-04-09T14:16:45+5:30

मुंबई सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

Dhananjay Munde and Karuna Sharma relationship is like marriage Mumbai court order | करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

Dhananjay Munde: घरगुती हिंसाचाराच्या आरोपाच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयानेधनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा या आपल्या पत्नी नसल्याचे म्हटलं. आम्ही लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये होतो असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. करुणा शर्मांसोबतचे संबंध हे विवाहाच्या स्वरूपाचे असल्याचे दिसून येते आणि घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्या दिलासा मिळण्यास पात्र असल्याचे कोर्टाने म्हटलं.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात, धनंजय मुंडे यांचे अपील फेटाळून लावले होते ज्यामध्ये त्यांनी करुणा शर्मांना देखभाल खर्च देण्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिले होते. धनंजय मुंडेंनी अपीलात दावा केला होता की त्यांचे कधीही करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नव्हते. यावर त्या कायदेशीररित्या विवाहित पत्नी आहे की नाही हे योग्य मंचाने ठरवावे, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत कारण त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि एकाच घरात राहिल्याशिवाय ते शक्य नाही, असे कोर्टाने सांगितले.

एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन, दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा आदेश देणे योग्य आहे. करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे कोर्टाने सांगितले आहे.

मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी करुणा शर्मा यांची याचिका मान्य केली होती. कोर्टाने धनंजय मुंडे यांना दरमहा १,२५,००० रुपये आणि करुणा यांच्या मुलीला ७५,००० रुपये देण्याचे आदेश दिले होते. करुणा शर्मा यांना २०२० मध्ये धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता आणि मुख्य याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. धनंजय मुंडेंनी अंतरिम आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले. अपील फेटाळून लावताना कोर्टाने, घरगुती हिंसाचाराची बळी पडलेली आणि लग्नासारख्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली महिला घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहे, असे म्हटलं.

दरम्यान, आपण करूणा यांच्याशी कधीही लग्न केले नव्हते. त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान झाली आणि वारंवार होणाऱ्या भेटींमुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले. या नात्यातून आम्हाला दोन मुले झाली आणि त्यांना आपले नाव आणि आडनाव वापरण्याची परवानगी दिल्याचेही मुंडेंनी सांगितले. मी कधीही करूणा यांच्या लग्न केले नाही. राजश्री मुंडे यांच्याशी आपला कायदेशीर विवाह झाल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला. 

Web Title: Dhananjay Munde and Karuna Sharma relationship is like marriage Mumbai court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.