'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:35 IST2025-03-29T15:32:26+5:302025-03-29T15:35:32+5:30
माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुण शर्मा यांच्या घटस्फोटोचा खटला कोर्टात सुरू आहे.

'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?
Dhananjay Munde ( Marathi News ) : करुणा मुंडे यांना देखभालीचा खर्च देण्याच्या दंडाधिकाऱ्यांचा अंतरिम आदेशाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी आज माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे लग्न अधिकृत नसल्याचा दावा केला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. यावेळी कोर्टाने शर्मा यांना अधिकृत लग्नाचा पुरावा आहे का? असा सवाल उपस्थित केला. यावेळी करणा शर्मा यांच्या वकिलांनी पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला.
कोर्टात युक्तिवादावेळी करुणा शर्मा यांच्या वकिलांनी पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला. अधिकृत लग्नाचे सगळे पुरावे आम्ही सादर करू, आम्हाला वेळ हवा आहे, असंही वकिलांनी सांगितलं. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असं न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे.
सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न?; अंजली दमानियांचा पुन्हा गंभीर आरोप
५ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत करुणा शर्मा अधिकृत लग्नाचे पुरावे सादर करणार आहेत.
कोर्टात नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न केलेच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. यावेळी न्यायाधीशांनी वकिलांना उलट प्रश्न केला. 'मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत?, असं न्यायाधीशांनी म्हटले.
यावेळी धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले, मुंडे यांनी मुलांना स्वीकारलं आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही. यावेळी कोर्टाने म्हटले, मुलं तुमची आहे म्हणता मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत.
१५ लाख इनकम तरीही पोटगीसाठी अर्ज
यावळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा यांच्या इनकमचा मुद्दा उपस्थित केला. वकील म्हणाले, १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इनकम करुणा शर्मा यांचा आहे, त्या इन्कमटॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे.
"दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वीकारले आहे. त्यांना नावे दिली आहेत, करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालावला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होतं नाहीत. पती पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि अधिकृत लग्नही झाले नव्हते, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला.