धनंजय माने इथेच राहतात का ? 30 वर्षानंतरही 'अशी ही बनवाबनवी'ची जादू कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 03:11 PM2018-09-23T15:11:23+5:302018-09-23T15:20:22+5:30

मुंबईत नोकरीच्या आणि करिअरच्या शोधात आलेल्या 4 गावाकडील तरुणांची ही भन्नाट कथा आहे.

Dhananjay Mane live here? Even after 30 years of ashi hi banwabanvi film | धनंजय माने इथेच राहतात का ? 30 वर्षानंतरही 'अशी ही बनवाबनवी'ची जादू कायम

धनंजय माने इथेच राहतात का ? 30 वर्षानंतरही 'अशी ही बनवाबनवी'ची जादू कायम

googlenewsNext

मुंबई - सचिन पिळगावरकर दिग्दर्शित भन्नाट विनोदी 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज 30 वर्षे झाली आहेत. 23 सप्टेंबर 1988 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लक्ष्या, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या तुफान कॉमेडीमुळे या चित्रपटाने अख्ख दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही या चित्रपटातील डायलॉग सोशल मीडियावर नेहमीच शेअर्स होतात. नुकतेच आर्टीकल 377 प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही त्यातील 'हा माझा बायको' हा डॉयलॉग व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत होता.

मुंबईत नोकरीच्या आणि करिअरच्या शोधात आलेल्या 4 गावाकडील तरुणांची ही भन्नाट कथा आहे. शिक्षण करिअरचा मेळ घालताना मुंबईत रुम मिळवण्यासाठी तरुणांची होणारी हेळसांड आणि त्यांनी लढवललेली शक्कल महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांना खूप आवडली होती. हसून हसून पोट दुखावा असा हा चित्रपट आणि यातील तेवढेच सरळ, सोपे असे अप्रतिम डॉयलॉग आजही दुरदर्शनवरील दुपारच्या 4 वाजताची आठवण करुन देतात. 

या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (परशुराम), अशोक सराफ (धनंजय माने), सुशांत रे (शंतनू माने), सचिन पिळगांवकर (सुधीर), सुप्रिया पिळगांवकर (मनीषा), निवेदिता जोशी (सुषमा), प्रिया अरुण (कमळी), अश्विनी भावे (माधुरी), सुधीर जोशी (विश्वास सरपोतदार), नयनतारा (लीलाबाई काळभोर) आणि विजू खोटे (बळी) या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. नेहमीच सर्वांना हसवणारा लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे सध्या जगात नाही. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून आणि धनंजय माने इथेचं राहतात का ? या डायलॉगमधून तो आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. 

या चित्रपटातील काही आवडते डायलॉग

धनंजय माने इथेच राहतात का ?
हा माझा बायको पार्वती.
निरंजन बाबाचा आंबा
वाट पाहा तो आणणार नं
तुमचे 70 रुपये पण वारले.
हा शुद्ध हलकटपणा आहे माने 
कसली औलाद जन्माला येणार हिच्या पोटी काही कळतचं नाही
कमळीशी लग्न करुन बाप व्हायचे स्वप्न बघतोय रे मी
लिंबू कलरची साडी

Web Title: Dhananjay Mane live here? Even after 30 years of ashi hi banwabanvi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.