देवेंद्र फडणवीसांची उंची नरेंद्र मोदी अन् सह्याद्रीपेक्षाही मोठी आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:06 PM2021-03-25T12:06:09+5:302021-03-25T12:07:10+5:30

राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. 

Devendra Fadnavis is taller than Narendra Modi and Sahyadri; Taunt by shiv sena leader Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांची उंची नरेंद्र मोदी अन् सह्याद्रीपेक्षाही मोठी आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीसांची उंची नरेंद्र मोदी अन् सह्याद्रीपेक्षाही मोठी आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

Next

मुंबई: मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याचपार्श्वभूमीवर एका पत्रकाराने बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना संजय राऊत यांच्या या विधानावरुन प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांना टोला लगावला  होता. 

संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. तुमच्याकडे बातम्या नसतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचता. संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला होता. राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपाचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी देखील आता टोला लगावला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. 

परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. परमबीर सिंह यांच्या पत्रात संशय घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. इतर कोणी पत्र लिहून दिले आणि परमबीर सिंग यांनी त्यावर फक्त सही केली का, अशी शंका संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे. संजय राऊत आज दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

राज्यपाल आजकाळ खूपच व्यस्त आहेत, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हेही मला माहिती नाही. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या लोकांचं राजभवनमध्ये येण-जाणं, खाणं-पिणं चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. 

फडणवीसांचा अहवाल भिजलेला लवंगी फटाका

फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचं नाही, आपण तो अहवाल वाचावा. जुन्या सरकारवर निष्ठा असलेल्या अधिकाऱ्यांनी काही कागद बनवले असतील, चांगल्या हेतूने. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कागदपत्रे दिली त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातसुद्ध नव्हती, आम्हीच दिल्लीत कुठं स्फोट झाला का, हे शोधत होतो, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालाची खिल्ली उडवली होती.  

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

दिल्लीत काल जाऊन जो अहवाल दिला, तो लवंगी फटका होता की, मोठा बॉम्ब होता, हे लवकरच समोर येईल. तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? २५ ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमके कोण यात लिप्त आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

Web Title: Devendra Fadnavis is taller than Narendra Modi and Sahyadri; Taunt by shiv sena leader Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.