Join us  

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; दमानियांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 6:46 PM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ashok Chavan Devendra Fadanvis ( Marathi News ) : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे अशोक चव्हाण हे लवकरच भाजमपध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'आगे आगे देखो, होता है क्या,' असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे संकेतही दिले आहेत. मात्र याच भाजपने याआधी अनेकदा अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यावरून अनेक गंभीर आरोप केले आहेत. तेच चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

"काँग्रेस -राष्ट्रवादीला मतदान करताय ? आधी आदर्श घोटाळ्याबद्दल जाणून घ्या," अशा शीर्षकासह देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. याच व्हिडिओची आठवण करून देत अंजली दमानिया यांनी आज फडणवीसांना उद्देशून म्हटलं आहे की, "एक वाक्य म्हणावसं वाटतंय. कोण होतास तू , काय झालास तू."

अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाविषयी थेट भाष्य केलं नसलं तरी अप्रत्यक्षपणे याबाबतचे संकेत दिले आहेत. "ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे असे अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. आगे आगे देखो होता है क्या," असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअंजली दमानियाकाँग्रेसअशोक चव्हाणभाजपा