फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 10:18 IST2024-09-27T10:18:21+5:302024-09-27T10:18:29+5:30

गृहमंत्री फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे. 

Devendra Fadnavis office vandalized by an unknown woman | फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस

फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात घुसून एका अज्ञात महिलेने गुरुवारी सायंकाळी नासधूस केली. संतापालेल्या या महिलेने यावेळी दरवाजावरील फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून फेकून देत तेथून पोबारा केला. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे. 

रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मंत्रालयात वर्दळ कमी होती. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी-अधिकारी घर गाठण्याच्या तयारीत असतानाच ६.३० वाजेच्या सुमारास एक महिला फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि आरडाओरडा करायला सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत तिने तेथील झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या. दालनाबाहेर असलेली त्यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. पोलीस येईपर्यंत ती अज्ञात महिला पळून गेली. रात्री उशीरापर्यंत ही महिला कोण होती हे समजू शकले नाही. मंत्रालय सुरक्षा विभाग तिचा शोध घेत आहे.
 

Web Title: Devendra Fadnavis office vandalized by an unknown woman