Devendra Bharti visited CM; this happen in 20 minutes discussion | देवेंद्र भारती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; २० मिनिटं झाली ही चर्चा 

देवेंद्र भारती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; २० मिनिटं झाली ही चर्चा 

ठळक मुद्देमारिया आणि तळोजा कारागृहातील कैद असलेला गुंड विजय पलांडे याने केलेल्या आरोपाबाबत भारती यांनी आपली बाजू त्यांच्याकडे मांडली असल्याचे समजते. सह्याद्री अतिथी गृहात मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता देवेन भारती सहयाद्री अतिथी गृहात दाखल झाले

मुंबई - माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आत्मचरित्रात केलेल्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या एटीएसचे प्रमुख देवेन भरती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. आज बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख ही उपस्थित होते. मारिया आणि तळोजा कारागृहातील कैद असलेला गुंड विजय पलांडे याने केलेल्या आरोपाबाबत भारती यांनी आपली बाजू त्यांच्याकडे मांडली असल्याचे समजते.

सह्याद्री अतिथी गृहात मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता देवेन भारती सहयाद्री अतिथी गृहात दाखल झाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि देवेन भारती यांच्यात सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. त्याचा चर्चेचा नेमका तपशिल समजला नाही. मात्र, भारती यांच्याबदद्ल होत असलेल्या आरोपांमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी पाचारण केले होते. त्यांच्याकडे त्या अनुषंगाने विचारणा करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून समजते.

English summary :
ATS chief deven bharti has visited to CM uddhav thackrey regarding contraversial Rakesh Maria Book information came out.

Web Title: Devendra Bharti visited CM; this happen in 20 minutes discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.