कोविड काळातही विकासकामे जोमात सुरू; पालिका प्रशासनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 01:57 AM2021-04-08T01:57:30+5:302021-04-08T01:58:02+5:30

दरवर्षी अर्थसंकल्पातील निम्मी रक्कम खर्च होत असल्याने अनेक कामांसाठी केलेल्या तरतुदी वाया जात असतात. त्यात पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.

Development work is in full swing even during the Kovid period | कोविड काळातही विकासकामे जोमात सुरू; पालिका प्रशासनाचा दावा

कोविड काळातही विकासकामे जोमात सुरू; पालिका प्रशासनाचा दावा

Next

मुंबई : गेल्या वर्षी मुंबईत मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. या काळात लॉकडाऊन करण्यात आल्याने विविध विकासकामे करणे पालिकेपुढे मोठे आव्‍हान होते. मात्र, २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासकामांसाठी तरतूद केलेली ८८.७५ टक्के रक्कम विविध कामांसाठी वापरण्यात आली आहे. ही टक्केवारी गेल्या ११ वर्षातील सर्वाधिक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

दरवर्षी अर्थसंकल्पातील निम्मी रक्कम खर्च होत असल्याने अनेक कामांसाठी केलेल्या तरतुदी वाया जात असतात. त्यात पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोविड काळातही जास्तीत जास्त तरतूद विकासकामासाठी वापरण्यात आली आहे. सुधारित अर्थसंकल्‍पीय अंदाजानुसार भांडवली खर्चासाठी १० हजार ९०३.५८ कोटी इतकी तरतूद करण्‍यात आली होती. या तरतुदींपैकी आतापर्यंत नऊ हजार ६७६.९७ कोटी रुपये म्हणजेच ८८.७५ टक्‍के रक्कम खर्च झाली आहे.
 
सन २०१९ - २० मध्‍ये सुधारित अर्थसंकल्‍पीय अंदाजातील भांडवली खर्चाच्‍या तरतुदींपैकी ८७.७० टक्‍के रकमेचा विनियोग करण्‍यात आला होता. हीच टक्‍केवारी यंदा वाढून ८८.७५ टक्‍के इतकी झाली आहे. 

या खर्चामध्‍ये प्रामुख्‍याने सागरी किनारा रस्‍ता प्रकल्‍प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मलनिसारण प्रकल्‍प, विकास आराखड्याशी संबंधित बाबी, रस्‍ते व वाहतूक, पाणी पुरवठा, आरोग्‍य, पर्जन्‍य जलवाहिन्‍या, पूल, घनकचरा व्‍यवस्‍थापन खाते,  पालिका शाळा आदींशी संबंधित भांडवली खर्चाचा समावेश आहे.

या विकासकामांवर खर्च...
(आकडेवारी कोटींमध्ये)
प्रकल्प        तरतूद    खर्च
कोस्टल रोड     १,५०० 
पालिका शाळांच्या 
पायाभूत सुविधांसाठी    १७९     १६६.४४ 
रस्ते व वाहतूक     १,४००    १,३७०.४३ 
पाणीपुरवठा         ९५६.८६    ८०७.७१ 
आरोग्‍य         ७८०.६९     ६२४.२६ 
पर्जन्‍य जलवाहिन्‍या     ७६७.२४     ६८८.८९ 
मलनि:सारण        ५६९.४४    ५२९.२२ 
पूल         ७५०     ६९६.७२ 
 

Web Title: Development work is in full swing even during the Kovid period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.