मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:06 IST2025-04-12T14:01:49+5:302025-04-12T14:06:00+5:30

नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही.

Despite Chief Minister Devendra Fadnavis directions and meeting with the Union Minister, tankers strikes remain continue in Mumbai | मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

Mumbai tanker strike: 'बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा', असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासकांना दिले. पण, शनिवारीही संपच सुरूच आहे. टँकर असोसिएशनची केंद्रीय मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासोबत बैठक झाली. पण, त्यातही तोडगा निघू शकला नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्र सरकारच्या सेंट्रल ग्राऊंड वॉटर अथॉरिटीचे नियम आणि त्यातच मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटिशी विरोधात मुंबईतील टँकर असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत संप पुकारला. गुरूवारपासून संप सुरू असून, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संप मिटवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते.

सुवर्णमध्ये साधत तोडगा काढा -मुख्यमंत्री फडणवीस

"मुंबईतील टँकरचालकांचा संप सुरु असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा, असे निर्देश मी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली होती. 

वाचा >>दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं

मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात दिशानिर्देश देऊनही संप कायम आहे. शनिवारी भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना प्रवीण दरेकर यांना भेटण्यास सांगितले होते. प्रवीण दरेकर यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाची केंद्रीय चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भेट घालवून दिली. 

चंद्रकांत पाटलांसोबतच्या बैठकीत काय झालं?

महापालिकेने नोटिशीला स्थगिती दिल्यानंतरही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. दरम्यान, टँकर असोसिएशनचे सचिव राजेश ठाकूर यांनी सांगितले की, "आज आम्हाला आशिष शेलारांनी दरेकरांना भेटायला सांगितलं. दरेकरांनी बीकेसीमध्ये केंद्रात जलसंपदा मंत्री असलेल्या चंद्रकात पाटील यांची भेट करून दिली. आम्ही आमच्या सगळ्या समस्या त्यांना सांगितल्या. आमच्या समस्यांचे समाधान झाल्यावर आम्ही आमची एक बैठक घेऊ, त्यात जे ठरेल ते आम्ही सांगू."

"आम्ही ना हरकत प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. पण, विहिरीच्या भोवतीची जी २०० चौरस फुटांच्या जागेची अट आहे, आता मुंबईसारख्या शहरात शक्य नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं की ती अट शिथील करा", अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

Web Title: Despite Chief Minister Devendra Fadnavis directions and meeting with the Union Minister, tankers strikes remain continue in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.