Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sunetra Pawar Portfolios: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडील खाती ठरली, तीन खात्यांच्या बनल्या मंत्री; अर्थ खाते कोणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:40 IST

Sunetra Ajit Pawar Portfolios: महाराष्ट्र राजकारणात मोठी घडामोड! सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी. राजभवनात शपथविधी संपन्न झाला.

Sunetra Ajit Pawar Portfolios: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.  सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. लोकभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. दरम्यान. आता सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार या चर्चा सुरू होत्या. पवार यांना तीन खाती मिळाली आहेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण,  अल्पसंख्यक विकास ही खाती मिळाली आहेत.

दरम्यान, अजित  पवार यांच्याकडे असणारी सर्व खाती सुनेत्रा पवार यांना मिळतील अशा चर्चा सुरू आहेत. पण, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते ते खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

सुनेत्रा पवारांनी आज घेतली मंत्रिपदाची शपथ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.  सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी नेत्यांकडून होत होती. त्यात सकाळी देवगिरी निवासस्थानी येत सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यानंतर हे सगळे नेते बैठकीतून बाहेर पडले. मग सुनेत्रा पवारांसह सगळेच नेते विधान भवनात पोहचले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar's portfolios finalized; three ministries allocated, who gets Finance?

Web Summary : Sunetra Pawar becomes Deputy Chief Minister, securing State Excise, Sports, and Minority Development portfolios. Speculation arose about her inheriting Ajit Pawar's responsibilities, but the Finance portfolio remains unassigned, sparking political discussions.
टॅग्स :सुनेत्रा पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार